काश्मिर हा भारताचा अविभाज्य भाग; अदनान सामीने पाकिस्तानी युजर्सला सुनावले

0
469

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – “काश्मिर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. ज्या गोष्टींचा तुमच्याशी काहीही संबंध नाही उगीचच त्या गोष्टींमध्ये तुम्ही नाक खूपसू नका”, अशा शब्दात गायक संगीतकार अदनान सामीने पाकिस्तानी युजर्सला सुनावले आहे.

काल स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी पाकिस्तानी युजर्सने अदनानला काही खोचक प्रश्न विचारले होते. त्यावर अदनानने सडेतोड उत्तर दिले आहे. अदनान तुझ्यात जर हिम्मत असेल तर काश्मिरच्या प्रश्नावर ट्वीट करून दाखव. मग पाहूया तुझा भारत तुझी काय अवस्था करतो, असे ट्वीट पाकिस्तानच्या युजर्सने केले आहे. पाकिस्तानी युजर्सच्या त्या ट्वीटवर, का नाही काश्मिर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. ज्या गोष्टींचा तुमच्याशी काहीही संबंध नाही उगीचच त्या गोष्टींमध्ये तुम्ही नाक खूपसू नका, असे उत्तर अदनानने दिले आहे.