काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता बीआरटीएस मार्गाला लहुजी साळवे यांचे नाव देण्याची मागणी

0
747

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता या बीआरटीएस मार्गाला क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी मातंग एकता शक्ती, पिंपरी-चिंचवड या संघटनेने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण अष्टीकर यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात संघटनेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त प्रवीण अष्टीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “पिंपरी-चिंचवड महापालिकेने काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता हा बीआरटीएस मार्ग विकसित केला आहे. या मार्गावरून बीआरटीएस बस सुरू करण्याचे नियोजन सुरू आहे. या मार्गाला क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे नाव देण्याची मागणी पालकमंत्री गिरीष बापट आणि भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्याकडे करण्यात आली होती. त्याबाबत त्यांनी प्रशासनाला व महापालिकेतील पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. त्यानुसार कार्यवाही करण्याबाबत आपण प्रशासनाला आदेश द्यावेत. येत्या १ ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे. याच दिवशी काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता या बीआरटीएस मार्गाला क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे नाव देण्याची घोषणा व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.”

निवेदनावर संघटनेचे बाबू पाटोळे, मनोज मातंग, प्रवीण लोखंडे, विनोद गायकवाड, युवराज दाखले, अविनाश शिंदे, विठ्ठल झिंजरुटे, अविनाश सोनपारखे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत