काळेवाडीमध्ये भर दिवसा दोन लाखांची घरफोडी

0
292

काळवाडी,दि.28(पीसीबी) : काळेवाडी येथील सहयोग कॉलनी, राजवाडेनगरमध्ये अज्ञात चोरट्यांनी भर दिवसा घरफोडी करून एक लाख 98 हजारांचे दागिने चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 27) दुपारी अडीच ते साडेतीन वाजताच्या सुमारास घडली आहे.

नयन आनंद राऊत (वय 40, रा. राजवाडेनगर, काळेवाडी) यांनी याबाबत मंगळवारी (दि. 27) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राऊत त्यांच्या घराला कुलूप लाऊन मंगळवारी दुपारी अडीच वाजता बाहेर गेल्या. एक तासाने त्या घरी आल्या असता त्यांच्या घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी घरात पाहणी केली असता घरातील कपाटातून एक लाख 98 हजारांचे 39 ग्राम वजनाचे सोन्याचे आणि दोन भार वजनाचे चांदीचे दागिने चोरीला गेल्याचे उघडकीस आले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.