Chinchwad

काळेवाडीत सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाचा ४१ वा वार्षिक स्नेह मेळावा उत्साहात साजरा

By PCB Author

August 20, 2018

चिंचवड, दि. २० (पीसीबी) – सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाचा ४१ वा वार्षिक स्नेह मेळावा काळेवाडी येथील ज्योतीबा मंगळ कार्यालय येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी मुलांच्या भाषण आणि सांस्कृतीक कार्यकमाबरोबरच नाट्यसिंधुच्या वतीने प्लास्टिक बंदीबाबत समाज प्रबोधनपर एकांकीका सादर करण्यात आली.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला कोकण सुपुत्र मेजर कौस्तुभ राणे यांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. त्यानंतर कोकण कन्या रिना आणि वर्षा विश्वास केसरकर या दोन उच्चशिक्षीत सख्ख्या बहिणींनी वडीलांच्या आजापणानंतर उत्कृष्ठ पद्धतीने शेती करून तरूणांच्या पुढे एक आदर्श घडविल्यामुळे त्यांना सिंधुदुर्ग जिल्हा भूषण पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात आले. तर रोख रक्कम अकरा हजार, मानपत्र, शाल आणि श्रीफळ देवून मंडळाच्यावतीने चंद्रकांत नाईक यांना गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे, चंद्रकांत चव्हाण, गणपत सावंत, शरद कवठणकर, भास्कऱ प्रभु, मधुसुदन परब पाच जेष्ठ कार्यकर्त्यांना जीवनगौरव देवून सन्मानित करण्यात आले.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष अजय पाताडे, रामकृष्ण राणे, अंकुशराव साईल, प्रमोद राणे, परशुराम प्रभु, अरविंद पालव, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड नगरसेवक, नगरसेविक आदी उपस्थित होते.