काळेवाडीत संत निरंकारी मिशनच्या वतीने युवा वर्गासाठी रविवारी इंग्लिश मेडीयम सत्संग सोहळ्याचे आयोजन

0
647

पिंपरी, दि. २८ (पीसीबी) – संत निरंकारी मिशनच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी काळेवाडीतील  विजयनगर येथील संत निरंकारी सत्संग भवनमध्ये रविवारी (दि. ३०) आध्यात्मिक इंग्लिश माध्यम सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

हा सोहळा सकाळी साडेदहा ते दुपारी १ या वेळेत होणार आहे. या सत्संग सोहळ्याला दिल्लीचे युवा प्रचारक राकेश मूटरेजाया यांच्यासह पुणे झोन मधून भोसरी, पुणे, आळेफाटा, नानगाव, पिंपरी-चिंचवड, जय-जवाननगर येथून बालक-युवक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

या सत्संगामध्ये नाटक, गीतगायन, विचार तसेच आध्यात्मिक प्रदर्शनी’च्या माध्यमातून संत निरंकारी मिशनचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. या  इंग्लिश मेडीयम सत्संगचा लाभ परिसरातील सर्व आबालवृद्धांनी घ्यावा, अशी माहिती पुणे झोन प्रभारी ताराचंद करमचंदानी यांनी दिली आहे.