काळेवाडीत एलबीटी इंग्लिश स्कूलमध्ये शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी

0
649

चिंचवड, दि. १९ (पीसीबी) – काळेवाडीतील शिवतेज क्रीडा व शिक्षण मंडळ संचलित श्रीमती लक्ष्मीबाई तापकीर माध्यमिक विद्यालय आणि एलबीटी इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विदयमाने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मंगळवारी (दि. १९) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. सतिश घरत होते. यावेळी माजी नगरसेविकाअनिता तापकीर, संस्थेचे सचिव सागर तापकीर, सोमनाथ तापकीर, संस्थेचे संचालक राजू पवार, कय्युम शेख, राजाराम शेळके, सुनिल म्हस्के, मुख्याध्यापक शशिकांत वाखारे आदी उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर भाषणे व पोवाडे सादर केले. तसेच पुलवामा मध्ये झालेल्या दहशतवादी हल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बापू बल्लाळ यांनी केले.