Notifications

काळेवाडीतील मेडिकल व्यवसायिकाला फोनवरुन धमकी

By PCB Author

December 12, 2018

चिंचवड, दि. १२ (पीसीबी) – प्रिस्क्रीपशन शिवाय औषध दिल्याने एक मुलगी आजारी पडली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिचा सर्व खर्च तुम्हाला करावा लागेल आणि नाही केला तर पोलीसांत तक्रार देईन, अशी धमकी देण्यात आली. ही घटना आज (गुरुवार) दुपारी तीनच्या सुमारास तुळजा भवानी कॉलनी, नढेनगर, काळेवाडी येथे घडली.