काळभैरवनाथ केसरीचे हर्षद सदगीर, पृथ्वीराज पाटील ठरले मानकरी

0
346

पिंपरी वाघेरे, दि. ७ (पीसीबी) – पिंपरीवाघेरे गावचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराज उत्सव निमित्त आयोजित कुस्ती आखाड्यामध्ये पै.हर्षद सदगीर व पै.पृथ्वीराज पाटील हे काळभैरवनाथ केसरी किताबाचे मानकरी ठरले आहेत.

पिंपरी वाघेरे गावातील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराज उत्सवानिमित्त 5 मे रोजी  नवमहाराष्ट्र विद्यालय क्रिडांगण येथे उत्सव कमिटीच्या वतीने कुस्ती आखाड्याचे आयोजन करण्यात आले होते. अनेक वर्षांची कुस्ती परंपरा असलेले पिंपरी वाघेरे ग्रामस्थांच्या वतीने सुमारे 2 लाख 61 हजार, 51 हजार, 41 हजार, 31 हजार अशी अनेक बक्षीस कुस्ती आखाडासाठी जाहीर करण्यात आली होती. यावेळी एकूण 56 कुस्त्यांचा रंगतदार सामने पाहण्याची संधी हजारो कुस्तीप्रेमी नागरिकांना मिळाली.

यावेळी महाराष्ट्र केसरी पै.पृथ्वीराज पाटील विरुद्ध हिंदकेसरी पै.नवीन कुमार तसेच पै.हर्षद सदगीर विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी अक्षय शिंदे यांच्यात श्वास रोखून धरणारी व उत्कंठावर्धक अश्या झालेल्या चुरशीच्या लढतीमध्ये पै.हर्षद सदगीर व पै.पृथ्वीराज पाटील हे काळभैरवनाथ केसरी किताबाचे मानकरी ठरले आहेत.

त्यांना कै.रघुनाथ दिनाजी वाघेरे यांच्या स्मरणार्थ माजी नगरसेवक संदिप वाघेरे यांच्या वतीने दोन लाख रुपये रोख व श्री. काळभैरवनाथ उत्सव समितीच्या वतीने चांदीची गदा देण्यात आली. कुस्ती स्पर्धेचे निवेदन हंगेश्वर धायगुडे, कुस्तीचे पंच वस्ताद पैलवान निवृत्ती काकडे यांनी केले. तसेच मान्यवर पाहुण्यांचे स्वागत हलगी वादक बापू आवळे यांनी केले.

यावेळी उत्सव कमिटीचे अध्यक्ष पै संदीप कापसे, माजी नगरसेवक संदीप वाघेरे, माजी विरोधी पक्ष नेते दत्तात्रय वाघेरे, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र वाघेरे, बाळासाहेब वाघेरे,पै.खंडू वाळूंज, पै.संतोष माचुत्रे, तानाजी वाघेरे आदी उपस्थित होते.