कार्पोरट अफेअर मंत्रालयाकडून तरूण नांगिया यांची नियुक्ती

0
295

नवी दिल्ली, दि. ७ (पीसीबी) – पत्रकार तरूण नांगिया यांची कार्पोरट अफेअर मंत्रालयाने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कार्पोरेट अफेअर च्या नियंत्रण समिती सदस्यपदी नियुक्ती केली आहे. देशातील गुंतवणुकदारांमध्ये आर्थिक साक्षरता वाढविण्याच्या दृष्टीने सहभाग घेण्याचे काम ही समिती करते.

गुंतवणूकदारांचे शिक्षण करणे, त्यांची जनजागृती आणि त्यांचे संरक्षण असे या समितीचे काम आहे. त्याशिवाय वाद टाळण्यासाठी गुंतवणुकदारांना सल्ला देण्याचे काम ही समिती करत असते. माध्यमांसाठीही महत्वाची भूमिका ही समिती बजावते. ज्या गुंतवणूकदारांची दावा न केलेली रक्कम (अनक्लेम्ड) पडून आहे त्याबाबत या समितीमार्फत निर्णय घेतले जातात. देशाच्या अर्थवयवस्थेला बळकटी देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याची जबाबदारी या समितीकडे असते. त्या दृष्टीने ही समिती अत्यंत महत्वाची समजली जाते.

तरूण नांगिया यांनी त्यांच्या पत्रकारितेची सुरवात पिंपरी चिंचवड शहरातून टाईम्स ऑफ इंडियाचे प्रतिनिधी म्हणून केली. सद्या ते इंडिया टिव्ही मध्ये सहयोगी संपादक (स्पेशल प्रोजेक्ट) या पदावर कार्यरत आहेत. दर आठवड्याला सादर होणारे लिगली स्पिकिंग, पॉलिसी अण्ड पॉलिटिक्स, ब्रांन्ड स्टोरी हे कार्यक्रम प्रसिध्द आहेत.