Bhosari

कार्तिकी यात्रे निमित्त आळंदीतील वाहतूक व्यवस्थेत बदल

By PCB Author

November 28, 2018

आळंदी, दि. २८ (पीसीबी) – कार्तिकी यात्रा आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्र्वर महाराज संजीवन समाधी सोहळा उत्सवा दरम्यान आळंदी आणि परिसारातील वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत चालावी म्हणून गुरुवार (दि.२९ ऑक्टोबर) ते गुरुवार (दि.६ डीसेंबर) या कालावधीत आळंदीत दिंड्यांसोबत येणारी वाहने तसेच अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता इतर सर्व वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे.

असा आदेश आज (बुधवार) पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेचे पोलीस उप-आयुक्त विनायक ढाकणे यांनी काढला आहे. या आदेशाबाबत काही सुचना आणि हरकती असल्यास नागरिकांनी पोलीस आयुक्त पिंपरी-चिंचवड, पोलीस आयुक्तालय, ऑटो क्लस्टर इमारत, चिंचवड पुणे-१९ यांच्या कार्यालयात लेखी स्वरुपात पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या आदेशामध्ये यात्रे दरम्यान वाहतूकीस बंदी घालण्यात आलेले रस्ते आणि उपलब्ध करुन दिलेले पर्यायी मार्ग पुढील प्रमाणे आहेत.

 

वाहतूकीस बंद करण्यात आलेले रस्ते पर्यायी मार्ग
पुणे-आळंदी रस्ता पुणे – दिघी मॅग्झीन चौक-भोसरी-मोशी-चाकण
मोशी-देहुफाटा रस्ता मोशी-चाकण-शिक्रापूर

मोशी-भोसरी-मॅग्झिन चौक-दिघी

हवालदारवस्ती मोशी मोशी हवालदारवस्ती-भोसरी
चाकण-आळंदी रस्ता चाकण-मोशी मॅग्झिन चौक-दिघी-पुणे(पुणे बाजूकडे जाण्याकरिता)

चाकण-पिंपळगाव फाटा-मरकळ-लोणीकंद (सोलापूर हायवे)

वडगाव-घेनंद-आळंदी रस्ता वडगाव-घेनंद-पिंपळगाव फाटा चाकण-नाशिक हायवे रोडने पुमे
मरकळ-आळंदी रस्ता मरकळ-सोळू-धानोरे-चऱ्होली खुर्द (पी.सी.एस.कंपनी फाटा)-बायपास रोडने चऱ्होली बु.पुणे
चिंबळी-आळंदी रस्ता चिंबही-मोशी-भोसरी-मॅग्झिन चौक-दिघी-पुणे

 

अपात्कालीन मार्ग

श्री. ज्ञानेश्र्वर महाराज समाधी मंदीर (आळंदी) – चाकण चौक – इंद्रायणी हॉस्पी (आळंदी)-चाकण