Maharashtra

“काय बोलता काय…टीआरपी घोटाळा इतके हजार कोटींचा ?”

By PCB Author

December 18, 2020

मुंबई, दि.१८ (पीसीबी) – टीआरपी घोटाळ्यांमध्ये दिवसेंदिवस धक्कादायक माहिती समोर येऊ लागलेली आहे. गुन्हे शाखेकडून टीआरपी घोटाळ्याचा अहवाल ईडीला देण्यात आला आहे. सिरीयस फ्रॉड इन्व्हेस्टीगेशन डिपार्टमेंट आणि ईडीला टीआरपी घोटाळ्याचा अहवाल पाठवण्यात आला आहे. आतापर्यंत अटक करण्यात आलेले आरोपी आणि किती कोटींचा हा घोटाळा आहे, याबद्दलचा सविस्तर अहवाल ईडी आणि एसएफआयडी विभागाला देण्यात आला. प्राथमिक माहितीनुसार जे फॉरेन्सिक ऑडिट करण्यात आलेलं आहे त्यात 1 हजार कोटीहून अधिक रकमेचा हा घोटाळा असल्याचं अहवालात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान महाराष्ट्राच्या बाहेरचे केबल ऑपरेटर्सना स्टेटमेंटसाठी बोलावण्यात आले आहे. ते आमचे साक्षीदार आहेत. 70 केबल ऑपरेटर जबाबासाठी येत आहेत, अशी माहिती तपास यंत्रणेने दिली आहे. ड्युएल ट्रिपल एनसीएम या माध्यमातून टीआरपी वाढवता येतो का याचा तपास सुरू आहे. रिपब्लिकच्या घनश्याम सिंग यांना अटक केल्यानंतर धक्कादधक्कादायक माहिती उघड झाली आहे. रिपब्लिक टीव्हीच्या मॅनेजमेंटमधील इतर काही जणांशी मिळून टीआरपी चुकीच्या पद्धतीने वाढवण्यासाठी त्याची चर्चा सुरू होती, अशी माहितीही समोर आली आहे.

काही केबल ऑपरेटरच्या माहितीनुसार बार्क आणि हंसाचे काही लोक टीआरपी घोटाळ्यासाठी जबाबदार आहेत, हे समोर येताच त्या दिशेने तपास करण्यात आला आणि रोमिल रामगडीया यांच नाव समोर आलं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे रोमिल रामगडीया हे बार्कचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. जुलै 2020 पर्यंत त्यांनी तिथे काम केलेले आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी बार्कचा राजीनामा दिलेला आहे. त्यांचा मोबाईल जप्त करण्यात आलाय. ते पर्यंत बार्कमध्ये काम करत होते तोवर काही चॅनेलला त्यानी फेक टीआरपी मिळण्यासाठी मार्गदर्शन केलेलं आहे. खास करून रिपब्लिक टीव्हीला त्यांनी मदत केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

देशात कुठे कुठे बॅरोमिटर आहेत याची सगळी माहिती आरोपी रोमील रामगडीया याला होती त्यानुसार त्याने ती काही चॅनेल्सना पुरवली अशी माहिती समोर आलीय. फेक टीआरपी मिळवण्यासाठी आरोपी रोमिलचे रिपब्लिकच्या संचालक आणि सीईओ विकास खानचंदानी यांच्याशी फोनवरून आणि व्हॅटसपच्या माध्यमातून बोलणं झाल्याचे त्यांनी सांगितले आहे. गेल्या 2 वर्षांपासून तो ही माहिती काही ठराविक माध्यमांना पुरवत होता, असेही तपासात पुढे आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे