Maharashtra

कायदा कुणीही हातात घेणार असेल तर त्याची गय केली जाणार नाही

By PCB Author

February 18, 2020

मुंबई, दि.१९ (पीसीबी) – परळी येथील टॉवर चौक परिसरात काल (दि. १७) रोजी दोन गटात प्रॉपर्टीच्या वादातून भांडण झाले होते, त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. त्यांनतर भांडणातील आरोपी धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये झळकल्या, त्यांनतर धनंजय मुंडेंनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मुंडे म्हणाले, परळी येथील व्यापारी, नागरिक सगळेच जण माझे निकटवर्तीय आहेत, जवळचा किंवा दूरचा असे काही नाही. दोघांच्या वादात कुणीही कायदा हातात घेणार असेल तर त्याची गय मी करणार नाही. कोणत्याच परिस्थितीत शहरातील कायदा व सुव्यवस्था बिडघडलेली मी खपवून घेणार नाही. पोलीस प्रशासनाला तशा सूचना दिल्या असून संबंधित आरोपींवर ३०७ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच यातील आरोपींना २४ तासाच्या आत अटक करण्यात आली आहे असेही यावेळी बोलताना मुंडे म्हणाले.