काम संपवून घराकडे निघालेल्या वकिलावर येरावडा परिसरात गोळीबार

0
1557

पुणे, दि. २३ (पीसीबी) – दिवस भरातील काम संपवून घराच्या दिशेने निघालेल्या वकिलावर अज्ञाताने गोळीबार केला. ही घटना सोमवारी (दि. २२) रात्री नऊच्या सुमारास पुण्यातील संगमवाडी परिसरात घडली आहे. गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या वकिलास कोरेगाव पार्क् परिसरातील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अॅड. देवानंद ढेकणे (रा. येरवडा) असे गोळीबारामध्ये जखमी झालेल्या वकिलाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अॅड. ढोकणे सोमवारी (दि. २२) रात्रीच्या सुमारास येरवडा येथील दिवसभराचे काम आटपून घराकडे निघाले होते. यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर संगमवाडी परिसरात गोळीबार केला. मात्र, कोणत्या कारणामुळे गोळीबार झाला हे अद्याप स्पष्ट झाले नाही. येरवडा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि गुन्हे शाखेतील पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, त्यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोराने गोळीबार केल्याची माहिती समोर येत आहे. पोलिस तपास करत आहेत.