कामावर असताना वरिष्ठांनी झापले म्हणून त्याने काय केले पहा….

0
348

थेरगाव, दि.29 (पीसीबी) : कंपनीत काम करत असताना एका कामगाराला वरिष्ठ अधिका-यांनी झापले. त्याचा राग मनात धरून ओरडा खाल्लेल्या त्या कामगाराने सहकारी कामगाराच्या घरात घुसून त्याला मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 26) रात्री साडेअकरा वाजता ताथवडे येथे घडली.

अपूर्व लक्ष्मीनारायण सोनी (वय 29, रा. मुन सोसायटी, अशोक नगर, ताथवडे) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तरुण सुभाषचंद्र यादव (वय 23, रा. ताथवडे) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकाच कंपनीत कामाला आहेत. आरोपी तरुण याला त्याच्या डायरेक्टर साहेबांनी त्यांच्या केबिनमध्ये बोलावून ओरडले. त्याचा राग मनात धरून तरुण याने त्याचा सहकारी फिर्यादी अपूर्व यांच्या घरात घुसून शिवीगाळ केली. त्यानंतर कोणत्यातरी कठीण धारदार वस्तूने फिर्यादी यांच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.