“कामाच्या अनोख्या शैलीमुळे अनुपची युवकांमध्ये वाढतेय क्रेज” – माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे..

0
353

– अनुप मोरे हे माझ्या सख्या भावाप्रमाणे; त्यांचे पुढचे वर्ष नक्कीच खास – आ. लक्ष्मण जगताप…

– कोरोनाच्या मार्गदर्शक प्रणालींचा अवलंब करीत अनुप मोरे यांचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा…

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) :- भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष तथा युवा वॉरियर्सचे राज्य संयोजक अनुप मोरे यांचा वाढदिवस कोरोनाच्या मार्गदर्शक प्रणालींचा अवलंब करीत रविवारी (दि. २६) रोजी मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला.

दरम्यान अनुप मोरे यांच्या मातोश्री माजी उपमहापौर तथा नगरसेविका शैलजाताई मोरे यांनी वाढदिवसानिमित्त अनुप मोरे यांचे औक्षण केले तर, त्यांचे वडील अविनाश मोरे यांनी त्यांना पुढील आयुष्यात यशदायी होण्याचा आशीर्वाद दिला. यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील, यासह त्यांच्यावर राज्यभरातून राजकीय, सामजिक, शैक्षणिक, उद्योग विश्वातून फोन आणि डिजिटल माध्यमाद्वारे शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

त्या प्रसंगी राज्याचे माजी उर्जामंत्री तथा भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे, भाजयुमो प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, भाजयुमो प्रदेश सरचिटणीस सुशील मेंगडे, चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप, सागर शिंदे आदींनी व्यासपीठावर हजेरी लावली.

माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, अनुप मोरे नावाचं हे व्यक्तिमत्व चळवळीतून उदयास आलेलं आहे. युवा मोर्चा आणि युवा वॉरियर्सच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात युवकांना सशक्त करण्याची जबाबदारी मोठ्या ताकदीनं ते पेलत आहेत. त्यांच्या कामाच्या अनोख्या शैलीमुळेच युवकांमध्ये त्यांची क्रेज वाढत आहे. युवक त्यांच्याकडे पदाचा आव न दाखवणारा उद्याचा नेता म्हणून पाहतात. तब्बल पंचवीस लाख युवांना मानव संसाधन विकासासाठी मुख्य प्रवाहात आणण्याचे त्यांचे काम कौतुकास्पद आहे.

आमदार जगताप म्हणाले, अनुप मोरे हे माझ्या सख्या भावाप्रमाणेच आहेत. त्यांनी प्रशासनाकडून प्रभागात ज्या कौशल्यपूर्वक कामे करवून घेतली, त्याला तोड नाही. माथाडी कामगारांसाठी देखील कायम झटत असतात. या त्यांच्या चांगल्या कार्याची पोच त्यांना नक्कीच मिळेल. त्यामुळेच पुढील वर्षीचा त्यांचा वाढदिवस नक्कीच खास असेल.

प्रभागात वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मधुमेह-सांधेदुखी अभियानांतर्गत आरोग्य शिबीर, मोरया हॉस्पिटलच्या सहयोगातून रक्तदान शिबीर, यात तब्बल १०० बाटल्या रक्त संकलित झाले. पाणी गळती प्रात्यक्षिक शिबीर, ‘साठीनंतरचे आरोग्य व काळजी’ या विषयावर व्याख्यानाचा अनेक जेष्ठांनी लाभ घेतला. महिला भजनी मंडळासाठी भव्य भजन महोत्सव, महिलांसाठी पाककला आणि रांगोळी स्पर्धेच्या माध्यमातून महिलांनीदेखील बक्षिसांची लयलूट केली.

यावेळी माजी महापौर आर एस कुमार, सलीम शिकलगार, विजय शिनकर, मनोज देशमुख, सचिन कुलकर्णी, अरुण थोरात, प्रसेन अष्टेकर, सागर घोरपडे, माणिक फडतरे, केतन जाऊळकर, महेश मालखे, आनंद देशमुख, प्रशांत बोरा, समीर जवळकर, नरेंद्र येलकर, हेमंत देवकुळे, जितेंदर सिंग सितल, मिनाक्षी शहाणे, सौ. राधिका बोर्लीकर, सौ. नीलिमा कोल्हे, रमेश घाटे, नवनीत गांधी, सुधाकर मोरे, चंद्रकांत पाटील, युवा वारियर्सचे ऋतुजा कुलकर्णी, हर्ष देशमुख, शुभम शिंदे, स्वानंद कुलकर्णी, जयेश मोरे, सागर फलके, आशिष राउत, सहदेव म्हस्के आदी उपस्थित होते.