कामशेतमध्ये विचित्र अपघात; रिक्षाचालकाच्या मांडीत घुसले हँडल

0
907

कामशेत, दि. १४ (पीसीबी) – कामशेत येथील जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर कंटेनरने रिक्षाला दिलेल्या जोरदार धडकेत रिक्षाचालकाच्या मांडीत रिक्षाचे हँडल घुसले. हा अपघात गुरूवारी (दि.१३) रात्री साडेनऊच्या सुमारास कामशेत येथील मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर घडला.  

प्राप्त माहितीनुसार, गुरूवारी रात्री साडेनऊच्या सुमारास कामशेत येथील मुंबईहून पुण्याच्या दिशेने येत असलेल्या कंटेनरने रिक्षाला जोरदार धडक दिली. या जोरदार धडकेमुळे रिक्षाचालकाच्या मांडीत रिक्षाचेच हँडल घुसले. यामुळे रिक्षाचालक यातना सहन करत रिक्षातच अडकून होता. काही स्थानिक नागरिकांनी रिक्षाचालकाच्या मांडीत घुसलेले हँडल बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण त्यांना ते जमले नाही. यामुळे रिक्षाचे हँडल कट करुन रिक्षाचालकाला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून ते हँडल काढले. सध्या रिक्षाचालाकाची प्रकृती स्थीर आहे.