कामगार नेते सुर्यकांत महाडिक यांचे निधन

0
267

मुंबई,दि.११(पीसीबी) – भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष, शिवसेनेचे माजी आमदार सुर्यकांत महाडिक यांचे आज रात्री साडे आठ वाजता अल्प आजाराने निधन झाले.

त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. चेंबूर येथील अमर निवास, महादेव पाटील वाडी, बोर्डा, घाटलागाव येथे निवासस्थानी सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल.  त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील काडवली (ता. खेड) या त्यांच्या मूळ गावी त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. महाडिक यांच्या निधनाने भारतीय कामगार सेनेचा दीपस्तंभ हरपल्याची भावना भारतीय कामगार सेनेतूून व्यक्त करण्यात येत आहे.