Maharashtra

कामगार कायद्यातील बदलावर राज्यपालांना पिंपरी चिंचवडचे उपमहापौर घोळवे यांचे निवेदन

By PCB Author

December 30, 2020

मुंबई, दि. ३० (पीसीबी) – कामगार कायद्यातील बदलांच्या संदर्भात राज्याचे राज्यापाल भागतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे श्रमिक एकता महासंघाचे प्रतिनिधींनी भेट घेतली. अध्यक्ष दिलीप पवार, सल्लागार व पिंपरी चिंचवडचे उपमहापौर केशव घोळवे, मनोज पाटील यांनी भेट घेऊन निवेदन राज्यपाल यांना सादर केले.

कामगारांवर होणाऱ्या प्रतिकूल परिणामाचा व त्यानुसार कायदयामध्ये व नियमांमध्ये करायच्या दुरुस्ती, बदलासंदर्भात राज्यपाल महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि सविस्तर देत चर्चा केली. या बद्दलचा अहवाल केंद्राकडे पाठून पाठपुरावा करण्याचे आश्वासन, राज्यपाल कोश्यारी यांनी दिले. कामगार हितासाठी याकडे सकारात्मकतेने पाहण्याची गरज राज्यपालांनी व्यक्त केली. बैठक सकारात्मक झाली.