Maharashtra

कामगार / कर्मचारी गैरहजर राहिला तर त्यांचे पगार कापू नका -कामगार उपायुक्त शैलेंद्र पोळ

By PCB Author

March 23, 2020

 

औरंगाबाद, दि.२३ (पीसीबी) – कामगार / कर्मचारी या कारणास्तव गैरहजर राहिला तर त्यांचे वेतनात / पगारात कपात करु नये व तो सलग कामावर आहे , असे गृहीत धरावे असे आवाहन कामगार उपायुक्त शैलेंद्र पोळ यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्याकरिता महाराष्ट्र शासनाने सर्व नागरिकांना , कामगारांना कर्मचा – यांना आपापल्या घरातच रहाण्याची सूचना दिली आहे .

अशा परिस्थितीत काही मालक आपल्या कामगारांना / कर्मचा – यांना विना पगारी सुट्टीवर पाठवण्याची किंवा कामावरुन कमी करण्याची शक्यता नाकारता येत नाही . अशा आपत्तीचा संघटीतपणे सुजाणतेने मुकाबला कारण्याकरिता प्रत्येक आस्थापनां / दुकानें / संस्था तथा कारखान्यांच्या मालक तथा व्यवस्थापकांना आवाहन करण्यात येत आहे की , अशा राष्ट्रीय आपत्तीचे वेळी कोरोना विषाणूचा संसंर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये , प्रसार होवू नये , याकरिता आपण नियुक्त केलेल्या प्रत्येक कामगार / कर्मचारी / कंत्राटी कामगार / रोजंदार कामगार आणि प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष नियुक्त केलेल्या प्रत्येक व्यक्तीला या कालावधीत गैरहजर राहिल्याबद्दल कामावरुन कमी करु नये अथवा त्यांची रजा विनावेतनी करु नये , जणेकरुन त्यांचा रोजगार बुडून त्यांच्या पोटापाण्याचा / उपासमारीचा प्रश्न निर्माण होणार नाही

या आपत्तीमुळे जर कोणा कर्मचा – याची / कामगाराची नोकरी गेली तर आर्थिक नुकसानी मुळे अशा आपत्ती विरुध्द लढण्याची त्यांची मानसिकता रहाणार नाही व संसर्गाचा प्रादुर्भाव वाढून त्याचा सर्व सामाजिक जिवनावर विपरीत परिणाम होईल . करिता आपणास विनंती वजा आवाहन करण्यात येते की , आपल्याकडे आस्थापनेत / दुकानात / कारखान्यात काम करणा – या प्रत्येक व्यक्तीस घराबाहेर न पडण्याची , विषाणूचा संसर्ग न वाढण्याची सूचना द्यावी व जे गैरहजर रहातील ते कामगार आहेत , असे गृहीत धरुन त्यांचे वेतन व सेवा अखंडीत सलग रहातील याची खात्री आपण आपल्याकडे काम करणा – या प्रत्येक व्यक्तीस द्यावी असेही आवाहन या पत्रकात करण्यात आले आहे.