कामगारांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून अन्नदान वाटप

0
585

 

चाकण, दि.५ (पीसीबी) – कोरोना या आजाराचा संसर्ग रोखण्याकरिता देशभरात २१ दिवसाचा बंद पाळण्यात आला आहे. बंदच्या काळात शहरातील सर्व दुकाने, हाॅटेल व टपर्‍या बंद असल्याने वाटसरू नागरिक व शहरातील हातावर पोट असणारे गोरगरीब यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये याकरिता शहरातील व परिसरातील गोरगरीब नागरिक, कातकरी व आदिवासी समाज यांना देखील मदत करण्यासाठी विविध संघटना पुढे सरसावल्या आहेत.

याच पार्श्वभूमीवर कोरोना व्हायरस मुळे शासनाने दिलेल्या आदेशाने सर्व सामान्य परिवाराच्या मदतीच्या स्वरूपात सचिन हनुमंत खुडे ,चेतन मोरे व दिपक चौधरी हे तिघेजण चाकण येथे skoda auto volkwagen india pvt ltd या कंपनी मध्ये नोकरी करतात. या तिघांनी सामाजिक बांधिलकी जपत चालू असलेल्या कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने केलेल्या lockdown मध्ये सर्व उद्योग बंद आहेत .दुकाने बंद आहेत त्यामुळे ज्या कुटुंबातील व्यक्ती नोकरीला आहेत त्यांना येणाऱ्या वेतनामध्ये त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालू आहे .पण जे मजूर लोक रोजगारासाठी रोज नवे किंवा मिळेल ते काम करतात .त्यांच्यावर व संचार बंदी व वाहतूक बंदी असल्याने सिग्नलला उभे असणारे लोक यांच्यावर उपासमारीची वेळ ये म्हणून सचिन हनुमंत खुडे, चेतन मोरे, दिपक चौधरी या तिघांनी मिळून ठरवले की आपण काही थोडी मदत करू शकतो का ? मदतीसाठी हात पुढे करत lockdown मध्ये कोणतेही हॉटेल किंवा जेवण बनवण्याची सोय नसल्याने या तिघांनी त्यांच्या कंपनीच्या किचन मध्ये जेवण तयार करून त्या गरजू कुटुंबाना जेवण पोहचवत आहेत.

या आगोदर सिग्नल वर राहणारे लोक यांची ही जेवणाची सोय केली.व आज सांयकाळी ६ वाजता सांगवी पोलीस स्टेशन चे रोहिदास बोऱ्हाडे यांच्या सोबत जाऊन जुन्या सांगवी मधील पालिका गार्डनच्या बाजूच्या वस्ती मध्ये जाऊन त्या लोकांच्या जेवनाची व्यवस्था केली व त्यांना जेवण दिले असे सचिन हनुमंत खुडे यांनी सांगितले.

मन समाधानी ठेऊन मिळेल त्या वेळी गरजू लोकांना मदत करावी अशी विचारधारणा मनात ठेवावी असेही त्यांनी भावना व्यक्त केली.

हे तिघे सदाशिव पेठ पुणे येथील सुर्यकांत हिंगमीरे प्रतिष्ठानचे सभासद असल्याचे सांगण्यात येत आहे.

माझ्या महिला भंगिनिना छोटीशी मदत. सहकार्य तर कायमच रहाणार असे सचिन हनुमंत खुडे, चेतन मोरे, दिपक चौधरी आवाहन करण्यात आले आहे.