Pune

कामगारांच्या विषयाचा फक्त पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करु शकतो – अमोल कोल्हे

By PCB Author

March 08, 2020

राजगुरुनगर, दि.८ (पीसीबी) – खासदार अमोल कोल्हेंनी मतदारसंघातील राजगुरुनगरमध्ये जनता दरबार घेतला. यावेळी कामगारांसह युवकांनी त्यांच्या व्यथा कोल्हेंसमोर मांडल्या. राज्याचे कामगार मंत्री, आमदार, खासदार यांची कार्यक्षेत्र वेगळी असतात, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरुरचे खासदार अमोल कोल्हे म्हणाले.

तसेच यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘राज्याचा कामगार मंत्री आणि आमदार, खासदारांची कामे वेगळी आहेत. कामगारांबाबत कामगार मंत्र्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे. त्यामुळे कामगारांच्या विषयाचा फक्त पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करु शकतो”, असे कोल्हे म्हणाले.

आपल्याला न्याय मिळेल या आशेने कामगार अमोल कोल्हे यांच्या जनता दरबारात गेले होते. “साहेब तुमच्या एका फोनने आम्हाला आमचा कामाचा हक्क मिळेल”, असे कामगार अमोल कोल्हेंना म्हणाले. मात्र, त्यावेळी अमोल कोल्हेंनी न्याय देण्याऐवजी कागदी घोडे नाचवत आदेशाची मागणी करत कामगारांच्या विषयाला बगल दिला, असा आरोप कामगारांकडून करण्यात आला आहे.