Pune

कात्रज येथे रिअल इस्टेट एजंट अजयकुमार जैस्वाल यांच्या खूना प्रकरणी दोघांना अटक

By PCB Author

May 22, 2019

पुणे, दि. २१ (पीसीबी) – सोमवारी रात्री कात्रज परिसरातील सच्चाई माता डोंगरावर असलेल्या फार्म हाऊसमध्ये रिअल इस्टेट एजंट अजयकुमार सीताराम जैस्वाल (वय ४५, रा. कोथरुड) यांचा कोयत्याचे सपासप वार करुन खून करण्यात आला होता.

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी विनायक उर्फ चिंटू कुमार कुर्तकोटी (वय २८, रा. मेगा सिटी, कोथरुड) आणि अविनाश दिपक जाधव (वय २१) या दोघांना अटक केली आहे. चौकशी दरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. मात्र या दोघांनी अजयकुमार याचा खून का केला हे अद्याप समजू शकले नाही. भारती विद्यापीठ पोलीस तपास करत आहेत.