Pune

कात्रज येथील नवीन बोगद्यात आढळला मृतदेह

By PCB Author

January 17, 2019

कात्रज, दि. १७ (पीसीबी) – कात्रज येथील नवीन बोगद्याच्या अंतर्गत भागात आज (गुरुवार) दुपारी अडीचच्या सुमारास एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला.

घटेनची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्या व्यक्तीचा मृतदेह ससून रुग्णालयात पाठवला असून त्याची ओळख पटवण्याचे काम सध्या सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी अडीचच्या सुमारास कात्रज नवीन बोगद्याच्या अंतर्गत भागात दुरुस्तीचे काम करणाऱ्या मजुरांना तेथील पाइपलाइनमध्ये एका अनोळखी व्यक्तिचा मृतदेह आढळून आला. त्यांनी तातकाळ याची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांना दिली. पोलिसांनी तातकाळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन तो ससून रुग्णालयात पाठवला आहे. मयताची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलिसांनी तो भीक्षेकरी असल्याचा अंदाज वर्तवला आहे. भारती विद्यापीठ पोलिस तपास करत आहेत.