कात्रजमध्ये हप्ता न दिल्याच्या कारणावरुन दुकानदारांवर कोयत्याने वार

0
978

पुणे, दि. ११ (पीसीबी) – हप्ता न दिल्याच्या कारणावरुन दुकानदारांना धमकावून दोघा  दुकानादारांवर कोयत्याने वार केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.९) कात्रज येथील रंगाशेठ चौकात घडली.

याप्रकरणी दुकानदार तुषार चोथवे (वय ३१) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, उमेश बबन वाघचौरे (वय २३) आणि सागर शशिरा रसाळ (वय २१) या दोघांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुषार यांचे रंगाशेठ चौकात दुकान आहे. शुक्रवारी उमेश वाघचौरे, सागर रसाळ त्यांचे काही साथिदार हातात कोयते, बांबू आणि दगड घेऊन रंगाशेठ चौक परिसरात आले. त्यांनी चौकात दहशत माजवून दुकानदारांकडून ३ हजार रुपये हप्ता मागितला आणि त्यांची दुकाने बंद केली. दरम्यान, आरोपींनी तुषार यांच्या उघड्या दुकानाजवळ येत ‘आम्हाला हप्ता न देता दुकान का उघडले’, असा जाब विचारला. त्यानंतर तुषार आणि त्यांच्या भावाच्या अंगावर कोयत्याने वार केला. तुषारने वार चुकवला, तर तो उमेश वाघचौरेला लागला. यात उमेश वाघचौरे जखमी झाला आहे. ही भांडणे सोडवण्यासाठी आलेल्या काही जणांनादेखील आरोपींनी मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी  तुषारच्या घरावर देखील दगडफेक केली.  पोलिसांनी उमेश आणि सागर या दोघा आरोपींना अटक केली आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक बी. एच. अहिवळे तपास करत आहेत.