कात्रजमध्ये पतंग उडवताना टेरेस वरुन पडून १२ वर्षीय मुलाचा मृत्यू

0
581

पुणे, दि. १७ (पीसीबी) – मोठ्या भावासोबत इमारतीच्या टेरेसवर पतंग उडवण्यासाठी गेलेल्या  एका १२ वर्षीय मुलाचा इमारतीवरुन पडून दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना कात्रज गोकुळनगर येथे घडली.

ओम अतकरे (वय १२, रा. गोकुळनगर, कात्रज) असे या मृत मुलाचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ओम आणि त्याचा मोठा भाऊ पतंग उडवत होते. दरम्यान, मोठा भाऊ काही कामानिमित्त खाली आला होता. त्याचवेळी आईने नाश्ता करण्यासाठी ओमला बोलावून आन असे सांगितल्याने तो त्याला बोलावण्यासाठी टेरेसवर गेला. यावेळी ओम वर दिसला नाही. पंतग आणि मांजा खाली पडले होते. मोठ्या भावाने खाली पाहिले असता ओम रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्यानंतर कुटुंबियांनी ओमला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, इमारतीचे काम सुरू असल्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून योग्य त्या उपयोजना केल्या नसल्याचे ओमच्या वडिलांनी सांगितले आहे. भारती विद्यापीठ पोलीस तपास करत आहेत.