कात्रजमधील इलेक्ट्रॉनिक कंपनी भीषण आगीत जळून खाक

0
467

पुणे, दि. २० (पीसीबी) –  कात्रज बायपास रोडवरील मंतरवाडी चौकाजवळील इलेक्ट्रॉनिक कंपनी भीषण आगीत जळून खाक झाली. ही घटना आज (रविवार) पहाटे घडली. या आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, कात्रज बायपास रोडवरील मंतरवाडी चौकाजवळ  इलेक्ट्रॉनिका हायटेक मशीन टूल्स प्रा लि. ही कंपनी आहे. त्या कंपनीला पहाटेच्या सुमारास आग लागली. या आगीने क्षणात रौद्ररूप धारण केले. अग्निशमन  दलाच्या  तीन बंबाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.

या कंपनीत असणाऱ्या इलेक्ट्रॉनिक मशनरी, वायरिंग, कटिंग टूल्स, लोखंङी अॅगल व इतर साहित्य जळाले आहे.  या दुर्घटनेत कोणतीही जीवीतहानी झालेली नाही, मात्र वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे.  कोंढवा बुद्रुक, हडपसर  आणि  सेंट्रल फायर स्टेशनच्या  तीन बंबांनी आग केवळ अर्ध्या तासात नियंत्रणात आणली.