काटोल विधानसभा पोटनिवडणुकीला उच्च न्यायालयाची स्थगिती

0
559

नागपूर, दि. १९ (पीसीबी) – नागपूरमधील काटोल विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या प्रक्रियेला उच्च न्यायालयाने आज (मंगळवार) अंतरिम स्थगिती दिली आहे.  अडीच ते तीन महिन्यांसाठी निवडणूक घेऊन प्रशासन आणि उमेदवारांचे पैसे वाया जाऊ नयेत, यासाठी नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती, या याचिकेवर निकाल देताना उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

काटोल मतदारसंघातील आमदार आशिष देशमुख यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे  ही जागा रिक्त झाली होती.  काटोल विधानसभेची पोटनिवडणूक  लोकसभा निवडणुकीसोबत ११ एप्रिललाच घेण्यात येणार होती. मात्र,  महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता  सप्टेंबर महिन्यात लागण्याची शक्यता आहे.

त्यामुळे २३ मे रोजी मतमोजणी झाल्यावर जेमतेम अडीच-तीन महिन्यांसाठी आमदार निवडायचा आणि त्यासाठी एवढा खर्च आणि व्यवस्था लावायची, यासाठी सर्वच पक्षांचा विरोध होता. तसेच इतक्या कमी कालावधीसाठी निवडणुका का, असा भाजपने आक्षेप घेतला  होता. तसेच भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती.