Maharashtra

कांचन कुल झाशीच्या राणी, तर शरद पवार बारावा गडी – मुख्यमंत्री फडणवीस

By PCB Author

April 17, 2019

अकलूज, दि. १७ (पीसीबी) – बारामतीत कमळ फुलणारच असा दावा करून बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार  सुप्रिया सुळे यांना आव्हान देणाऱ्या भाजपच्या उमेदवार कांचन कुल या झाशीच्या राणी आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

अकलूज येथे  आज (बुधवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची  सभा झाली. या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर तोफ डागली. माढा येथील शूर मतदारांनी शरद पवारांऐवजी मोदींना साथ देण्याचे ठरवले. त्यामुळे ओपनिंग बॅट्समन म्हणून मैदानात आलेले शरद पवार बारावा गडी बनून तंबूतच बसले, असा टोला त्यांनी लगावला.

फडणवीस म्हणाले की, शरद पवारांनी सांगितले की मी  माढ्यातून निवडणूक लढवतो. पण जनता शूरवीर आहे, त्यांनी पवारांना सांगितले की आम्ही मोदींजीच्या सोबत आहोत. त्यामुळे ओपनिंग बॅटींग साठी आलेले पवार १२ वा गडी बनून तंबूत परतले, असे टोला  लगावला.  माढा  आणि बारामतीत  कमळ फुलणारच, असा दावा त्यांनी यावेळी केला.