लोकसभेसाठी काँग्रेस २४, राष्ट्रवादी २० जागा लढवणार – अशोक चव्हाण

0
725

मुंबई, दि. २३ (पीसीबी) – काँग्रेस २४ जागांवर तर राष्ट्रवादी २० जागांवर लोकसभा निवडणूक लढवणार आहे. बहुजन विकास आघाडीला १ जागा, स्वाभिमानीला २ जागा तर युवा स्वाभिमानी पक्षाला १ जागा देण्यात आली आहे, अशी माहिती  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज (शनिवार)  पत्रकार परिषदेत दिली.  

या पत्रकार परिषदेला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील गैरहजर होते. तर  राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, जोगेंद्र कवाडे आदी नेते उपस्थित होते.

स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्ष, पिपल्स रिपब्लिक पार्टी कवाडे गट, बहुजन विकास आघाडी, युवा स्वाभिमान पार्टी, ऑल इंडिया विमुक्त भटक्या जाती जमाती, आरपीआय डेमोक्रॅटीक, स्वाभिमानी रिपब्लिक पक्ष, भीमसेना, युनायटेड रिपब्लिक पक्षा, गणराज्य संघ, इंडियन डेमोक्रॅटिक अलायन्स, महाराष्ट्र मुस्लिम संघ, आंबेडकर विचार मंच, महाराष्ट्र परिवर्तन सेना, स्वाभिमान रिपाईं, आरपीआय खरात गट हे सगळे पक्ष महाआघाडीत सहभागी झाले आहेत, असे चव्हाण यांनी यावेळी सांगितले.