काँग्रेस सोडल्यानंतर उर्मिला मातोंडकर यांचा मोठा निर्णय

0
498

मुंबई, दि.१७ (पीसीबी) – शिवसेना पक्षात प्रवेश करणार असल्याचे वृत्त फेटाळून लावत  मी कोणत्याही राजकीय पक्षात जाणार नाही. मीडियाने माझ्या पक्षप्रवेशाबाबतचे कोणतेही तथ्यहीन तर्क लढवू नये, असे अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी म्हटले आहे. 

उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. उर्मिला यांनी  शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्याशी चर्चा केली आहे. त्या लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या.  या चर्चांचे खंडन करत  उर्मिला यांनी यावर पडदा टाकला आहे.

मी माझ्या मतांवर आणि विचारधारेवर ठाम असून जनतेसाठी निरंतर काम करणार आहे. मी कोणत्याही राजकीय पक्षात जाणार नाही. त्यामुळे मीडियाने ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवू नये. ते योग्य नाही, असे उर्मिला यांनी म्हटले आहे.  या खुलाशामुळे उर्मिला यांच्या शिवसेनेत जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.