काँग्रेस-राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत सुशीलकुमार शिंदेंचे सुचक विधान  

0
419

सोलापूर, दि. ९ (पीसीबी) –   काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघेही आता थकले आहेत. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येणे आवश्यक आहे, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी  केले आहे. भविष्यात काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीचे विलिनीकरण होईल, असा विश्वास  शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

सोलापूरमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार मनोहर सपाटे यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी  शिंदे बोलत होते.

शिंदे म्हणाले की, कधीकाळी आम्ही एका आईच्या मांडीवर वाढलो आहोत. आमच्याही मनात खंत आहे आणि त्यांच्याही (शरद पवारांच्या) मनात खंत असेल, मात्र ते बोलून दाखवत नाहीत. मात्र याची सुरुवात आज सोलापुरातून झाली आहे, असे शिंदे  म्हणाले.

दरम्यान, याआधीही काँग्रेस – राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावल्या होत्या. आता ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत शिंदे यांनी केलेल्या विलिनीकरणाच्या विधानावर पवार कोणती प्रतिक्रिया देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.