काँग्रेस-राष्ट्रवादी प्रत्येकी १२५ जागा लढवणार – शरद पवार

0
373

नाशिक,  दि. १६ (पीसीबी) – आगामी विधानसभा निवडणुकीत २८८ जागांपैकी  काँग्रेस-राष्ट्रवादी   प्रत्येकी १२५- १२५ जागा लढवणार आहेत . तर मित्रपक्षांना ३८ जागा सोडण्यात येणार आहेत,  अशी माहिती  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (सोमवार) नाशिक मध्ये पत्रकारांशी बोलताना दिली.  

तसेच  काही जागांची अदलाबदल करण्यात येणार आहे.  या निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे. तसेच शेकाप, जोगेंद्र कवाडे, राजू शेट्टी, आणि इतर डावे पक्ष  यांना एकत्र  करून ही  निवडणूक लढवणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा फॉर्म्युला ठरला  आहे. तरीही युतीच्या जागावाटपाबाबत मात्र अजुनही चर्चाच सुरु आहे. दोन्ही पक्षांनी किती जागा लढवायच्या आणि मित्र पक्षांना किती जागा द्यायच्या यावरुन युतीमध्ये आणखी मतभेद आहेत.  भाजप  शिवसेनेला १२० जागा देण्यास तयार आहे.  मात्र,  शिवसेना १३५ जागांच्या  मागणीवर ठाम आहे.