काँग्रेस-राष्ट्रवादीला खिंडार पडणार; ‘हे’ ११ नेते भाजप शिवसेनेत प्रवेश करणार?

0
632

मुंबई, दि. २० (पीसीबी) – भाजपचे  प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा  दावा खरा ठरण्याची शक्यता आहे. कारण काँग्रेस-राष्ट्रवादीचे ९ विद्यमान आमदार आणि ४  मोठे नेते शिवसेना-भाजपमध्ये प्रवेश करतील, असा अंदाज पॉलिटिकल रिसर्च अँड अॅनालिसेस ब्युरोने   वर्तवला आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक विद्यमान आमदार आणि पदाधिकारी लवकरच शिवसेना-भाजपमध्ये  तर  काहीजण वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.  यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर  काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा  चंद्रकांत पाटील यांनी सोलापुरात केला होता.  त्यांचा हा दावा  प्रत्यक्षात खरा ठरण्याची शक्यता आहे.

भारत भालके- पंढरपूरचे काँग्रेस आमदार – शिवसेनेच्या वाटेवर

-सिद्धराम म्हेत्रे- अक्कलकोटचे काँग्रेस आमदार- भाजपच्या वाटेवर

-जयकुमार गोरे- माणचे काँग्रेस आमदार- भाजपच्या वाटेवर

-बबनदादा शिंदे- माढातील राष्ट्रवादीचे आमदार- भाजपच्या वाटेवर

-रणजीत शिंदे- बबन शिंदेंचे पूत्र- भाजपच्या वाटेवर

-दिलीप सोपल- बार्शीचे राष्ट्रवादीचे आमदार- भाजपच्या वाटेवर

-ज्योती कलानी- उल्हासनगरच्या राष्ट्रवादीच्या आमदार- भाजपच्या वाटेवर

-संग्राम जगताप- नगरचे राष्ट्रवादीचे आमदार- शिवसेनेच्या वाटेवर

-अवधूत तटकरे- सुनील तटकरेंचे पुतणे- शिवसेनेच्या वाटेवर

-रमेश कदम- मोहोळचे राष्ट्रवादीचे आमदार- शिवसेनेच्या वाटेवर

-दत्तात्रय भरणे- इंदापूरचे राष्ट्रवादीचे आमदार- उमेदवारी न मिळाल्यास भाजपच्या वाटेवर

-प्रदीप कंद- शिरुरमधील राष्ट्रवादीचे झेडपी सदस्य- उमेदवारी न मिळाल्यास भाजपच्या वाटेवर

-चेतनसिंह केदार- राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि युवक तालुकाध्यक्ष- भाजपच्या वाटेवर