काँग्रेस-राष्ट्रवादीत ५ ते ६ जागांची आदलाबदल होईल – पृथ्वीराज चव्हाण

0
532

पिंपरी,  दि. १५  (पीसीबी) –  महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. २८८ पैकी सव्वाशेहून अधिक जागा दोन्ही पक्ष लढवेन, तर मित्र पक्षांसाठी ३८ जागा सोडण्यात येतील. तसेच  ५ ते ६ जागांची आदला बदली होईल, अशी माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

पिंपरी येथे पत्रकार परिषदेत चव्हाण  बोलत होते.

चव्हाण म्हणाले की, पिंपरी-चिंचवड आणि भोसरी या तीन मतदार संघांपैकी एक जागा काँग्रेसला मिळेल, असेही ते म्हणाले. विधानसभेला वंचित बहूजन आघाडीला बरोबर घेणार का असे विचारले असता जातीयवादी पक्षांना बाजुला ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.  मात्र, डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या अवास्तव मागण्या  आहेत.  त्यांच्या मागण्या म्हणजे अपरिपक्वतेचे लक्षण आहे.  त्यांच्या चुकीमुळेच लोकसभेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांची  ८ माणसे निवडून आली आहेत.

साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मतदारांना गृहीत धरु नये, असे सांगून साताऱ्यातून पोटनिवडणूक लढविणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.