काँग्रेस-राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले नेत्यांविषयी नितीन गडकरींचे मोठे भाकीत   

0
492

नागपूर, दि. १६ (पीसीबी) – काँग्रेस-राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले नेते भाजपची संस्कृती बदलतील किंवा भाजप त्यांची संस्कृती बदलेल, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले आहे. 

काळाच्या ओघात पक्ष विस्तार करायचा असतो, तेव्हा माणसे जोडावी लागतात. नागपूर भाजपमध्येही अनेकजण काँग्रेसमधून आलेले आहेत. त्यावेळी काँग्रेस पक्ष मोठा होता. मात्र, बाहेरुन भाजपमध्ये आलेल्या नेत्यांनी पक्षाची संस्कृती स्वीकारली, त्याप्रमाणे ते वागले, असे नितीन गडकरी म्हणाले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे एक सक्षम नेते आहेत. लोक त्यांना प्रतिसादही देतात. मात्र, त्यांच्या पक्षाची राजकीय रणनिती चुकली आहे. राजकारणात सत्ताधारी पक्षाचा विजय जितका महत्त्वाचा आहे, तितकाच ताकदवान विरोधी पक्ष असणे गरजेचे असते, असे मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

सत्ताधारी पक्षावर अंकुश ठेवणे विरोधी पक्षाचे काम आहे. त्यामुळे लोकशाही यशस्वी होण्यासाठी विरोध पक्षही महत्त्वाचा आहे. राज ठाकरे यांना विरोधी पक्षात बसण्याची इच्छा आहे ही चागंली गोष्ट आहे. जनतेने त्यांचा विचार करायला हवा, असे सूचक विधान गडकरी यांनी केले.