काँग्रेस मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याचे राजू शेट्टींना विशेष निमंत्रण  

0
490

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – मध्यप्रदेश, राजस्थान व छत्तीसगडमध्ये काँग्रेसने सत्तांतर घडवून आणले आहे.    या   राज्यांच्या  मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा सोमवारी  होणार आहे. यासाठी राजस्थानचे नियोजित मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांनी  महाराष्ट्रातील शेतकरी नेते व खासदार राजू शेट्टी यांना स्वतः फोन करून निमंत्रण दिले आहे. तसेच त्यांच्यासाठी खास विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे.