Maharashtra

काँग्रेस मुक्त देश केला, आता राष्ट्रवादी मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी सज्ज व्हा – पंकजा मुंडे

By PCB Author

August 26, 2019

मुंबई, दि. २६ (पीसीबी) – राष्ट्रीय समाज पक्षाच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील शिवाजी पार्कवर रासपचा महा मेळावा रविवारी मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी पंकजा मुंडे यांनी धनगर आरक्षणावरून विरोधकांवर चांगलीच फटकेबाजी केली.

यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की, सत्तर वर्षे कॉंग्रेस – राष्ट्रवादीने धनगर आरक्षणाचे नुसते गाजर दाखवले. आरक्षणाच्या दृष्टीने काहीही केले नाही. केवळ आश्वासन दिली. मात्र या सरकारने ते करून दाखवले. याआधी आम्ही कॉंग्रेसमुक्त महाराष्ट्राची घोषणा केली होती. मात्र ती खरी केली आता राष्ट्रवादी मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी सज्ज व्हा, असे म्हणत कार्यक्रमातील उपस्थितांना पुन्हा एकदा एकत्रितपणे सामान्य माणसांची सत्ता आणू असे आवाहन केले.