Maharashtra

काँग्रेस फुटली, अवघे चार नगरसेवक असणाऱ्या ‘या’ आघाडीचा भिवंडीत बसवला महापौर

By PCB Author

December 05, 2019

भिवंडी, दि.५ (पीसीबी) – भिवंडीत मोठा राजकीय भूकंप झाला असून महापालिकेत एकहाती सत्ता असणाऱ्या काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. भाजपा आणि बंडखोर काँग्रेसच्या मदतीने महापौरपदी अवघे चार नगरसेवक असणाऱ्या कोणार्क विकास आघाडीच्या नगरसेविका प्रतिभा पाटील महापौरपदी विराजमान झाल्या आहेत. ४७ नगरसेवक असणाऱ्या काँग्रेसची भिवंडी महापालिकेत एकहाती सत्ता होती. मोदी लाट असतानाही भिवंडीत मात्र काँग्रेसने सत्ता राखण्यात यश मिळवले होते. पण बंडखोरीमुळे एकहाती सत्तेलाही सुरुंग लागला आहे.

प्रतिभा पाटिल यांना एकूण ४९ मते मिळाली तर विरोधात असणाऱ्या काँग्रेसच्या रिषिका राका यांना ४१ मते मिळाली. काँग्रेसचे १८ नगरसेवक फुटल्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे.