काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंतांना धमकी; मुख्यमंत्र्यांनी दिले कारवाईचे आदेश   

0
371

मुंबई, दि. २६ (पीसीबी) –  काँग्रेसचे प्रवक्ते सचिव सावंत यांनी  भाजपच्या  मंत्र्यांवर व्यंगात्मक ट्विट केल्याने त्यांना अपशब्दांचा वापर करून  ट्रोल  करण्यात आले आहे. तसेच त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना धमकी देण्यात आली आहे.  या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

सचिन सावंत यांनी एक व्यंगात्मक ट्विट केले होते. त्यानंतर त्यांना ट्रोल करण्यात आले. तसेच धमकावण्यात आले. या संदर्भात विरोधीपक्ष नेते विजय वेडेट्टीवार यांनी झिरो हवर्समध्ये हा प्रश्न उपस्थित केला.  तसेच धमकवणाऱ्या आणि आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

यावर मुख्यमंत्री  फडणवीस यांनी अशा प्रकारे ट्रोलींग करणाऱ्यांना अजिबात पाठिशी घातले जाणार नाही. गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर आक्षेपार्ह भाषेत टीका कऱण्याचे प्रमाण वाढले आहे.   संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश सायबर क्राईमला देण्यात येतील,  असे सांगितले.  त्याचबरोबर अशा घटना रोखण्यासाठी कठोर कायद्यांची गरज आहे, असेही  फडणवीस  यांनी म्हटले आहे.