काँग्रेस पक्षाचे कार्यालयीन सचिव उत्तम भूमकर यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

0
267

पुणे,दि.०२ (पीसीबी) : काँग्रेस पक्षाचे कार्यालयीन सचिव उत्तम भूमकर यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने आज रविवारी दुपारी निधन झाले. ते ८० वर्ष वयाचे होते.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त काँग्रेस भवनात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार, वृक्षारोपण असा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या तयारीची पहाणी करीत असताना भूमकर अचानक कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. तत्पूर्वी त्यांचे प्राणोत्क्रमण झाले होते. भूमकर यांच्या निधनाची वार्ता कळताच काँग्रेस भवनात श्रध्दांजली वाहून कार्यक्रम रद्द करण्यात आले. गेली तीस वर्ष कॉंग्रेस भवनात कार्यालयीन सचिव म्हणून भूमकर काम पहात होते. पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे ते माजी सदस्य होते. काँग्रेसज्येष्ठ नागरिक संघाचे ते विद्यमान कार्याध्यक्ष होते.