काँग्रेस नेत्यांकडून ‘पाकिस्तान राष्ट्रीय दिवस’ साजरा करण्यास सुरूवात – पंतप्रधान मोदी

0
528

नवी दिल्ली,  दि. २२ (पीसीबी) – काँग्रेस नेत्यांनी आता ‘पाकिस्तान राष्ट्रीय दिवस’ साजरा करण्यास सुरुवात केली आहे, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसचे ओव्हरसीज अध्यक्ष   सॅम पित्रोदा यांच्या वादग्रस्त विधानाचा खरपूस समाचार घेतला आहे.

भारतात पुलवामासारखे हल्ले होतातच, त्यामुळे संपूर्ण पाकिस्तानला जबाबदार धरत पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करणे चुकीचे आहे, असे मत काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी व्यक्त केले आहे.  मोदींनी पित्रोदा यांच्या या विधानाचा समाचार घेताना काँग्रेसवर हल्ला चढवला आहे.

मोदी यांनी म्हटले आहे की, विरोधकांनी पुन्हा एकदा भारतीय जवानांचा अपमान केला आहे. १३० कोटी भारतीय जनतेने काँग्रेसला जाब विचारायला हवा.  मोदींनी  एक ट्वीट करत म्हटले आहे की, काँग्रेस नेत्यांनी पाकिस्तानचा राष्ट्रीय दिवस साजरा करण्यास सुरुवात केली आहे.