काँग्रेस नेते प्रवीण छेडा यांचा भाजपमध्ये प्रवेश  

0
400

मुंबई,  दि. २२ (पीसीबी) – मुंबई महापालिकेतील काँग्रेसचे माजी विरोधी पक्ष नेते प्रवीण छेडा यांची घरवापसी झाली आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमच्या एमसीए लॉनमधील कार्यक्रमात त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.  

मंत्री प्रकाश मेहता यांच्यासोबत असलेल्या मतभेदांमुळे प्रवीण छेडा यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. मात्र आता निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी  भाजपमध्ये प्रवेश केला आहे.  प्रवीण छेडा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत घाटकोपरमधून काँग्रेसच्या तिकीटावर  उभे  होते, मात्र, त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

भाजपची लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर  झाली आहे. यात ईशान्य मुंबईतील उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. या जागेवर किरीट सोमय्या विद्यमान खासदार असून युतीतील मित्रपक्ष शिवसेनेचा सोमय्यांना विरोध आहे. त्यामुळे प्रवीण छेडा  यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.