काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांना अटक; ईडीची कारवाई

0
480

बंगळुरू, दि. ४ (पीसीबी) – आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाने  (ईडी) काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांना अटक केली आहे.  गेल्याच वर्षी ईडीने शिवकुमार यांच्याविरोधात मनी लाँड्रिग प्रकरणी  कथित कर चोरी, हवाला यांच्या आधारे   काही प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत.   

यापूर्वीही २०१७ मध्ये डी. के. शिवकुमार यांच्या ६४ ठिकाणांवर आयकर विभागाने छापेमारी केली होती. दरम्यान या छाप्यांचा आणि मनी लाँड्रींग प्रकरणाशी संबंध नाही असेही शिवकुमार यांनी म्हटले होते. दरम्यान शुक्रवारी म्हणजेच ३० ऑगस्टला त्यांना ईडीने समन्स बजावले होते.

ईडीने नोव्हेंबर  २०१८ मध्ये शिवकुमार यांना नोटीस बजावली होती. परंतु शिवकुमार यांनी चौकशीसाठी हजर न राहण्याची मुभा मागितली होती.  परंतु त्यांना ईडीकडून दिलासा मिळाला नव्हता. त्यानंतर त्यांनी याविरोधात कर्नाटक उच्च न्यायालयात या विरोधात याचिका दाखल केली होती.  परंतु गुरूवारी त्यांची याचिका न्यायालयाने फेटाळली होती.