Maharashtra

काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकरने घेतली शरद पवारांची भेट

By PCB Author

April 11, 2019

मुंबई, दि. ११ (पीसीबी) –  उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर रिंगणात आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उर्मिला यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली.

उर्मिला मातोंडकर विविध मान्यवरांच्या भेटीगाठी घेऊन संवाद साधत आहेत.  त्यातच  शरद पवार यांचीही मातोंडकर यांनी भेट घेतली. पवारांच्या मुंबईतील निवासस्थानी दोघांची भेट झाली. पवार आणि उर्मिला मातोंडकर यांच्यामध्ये  सुमारे अर्धा तास चर्चा झाली.  राजकीय परिस्थितीबद्दल दोघांमध्ये चर्चा झाल्याचे  सूत्रांकडून समजते.

दरम्यान, उर्मिला मातोंडकर यांनी भाजपचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांच्यासमोर  आव्हान उभे केले आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शेट्टी यांनी काँग्रेस उमेदवार संजय निरुपम यांचा साडेचार लाखांच्या मताधिक्याने पराभव केला होता.  त्यामुळे आता उर्मिला मातोंडकर   शेट्टींच्या विरोधात किती मतदान घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.