Maharashtra

काँग्रेस आमदार अब्दुल सत्तारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; भाजप प्रवेशाची चर्चा

By PCB Author

March 24, 2019

मुंबई, दि. २४ (पीसीबी) – काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी  शनिवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली.  यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. अब्दुल सत्तार भाजपमध्ये प्रवेश करणार का?  याबाबत चर्चा सुरु झाली आहे.

सत्तारांना भाजपकडून काही ऑफर आहे का? भाजप सत्तारांना औरंगाबाद लोकसभेतून अपक्ष उभे करुन विद्यमान खासदार चंद्रकांत खैरेंना मदत करणार का?  सत्तार  भाजपमध्ये प्रवेश करणार का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

औरंगाबाद लोकसभा तिकीट वाटपावरुन  आमदार अब्दुल सत्तार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी पक्षाच्या घोषित उमेदवाराच्या विरोधात बंडाचा झेंडा फडकवला आहे. सुभाष झांबड यांना पक्षाने दिलेली उमेदवारी मान्य  नाही, असे सांगून त्यांनी  स्वतः लोकसभेच्या निवडणुकीत अपक्ष उभे राहणार असल्याचे जाहीर केले आहे.