Desh

काँग्रेस आमदार अदिती सिंहवर प्राणघातक हल्ला; हल्लेखोरांपासून बचाव करताना वाहन उलटले

By PCB Author

May 14, 2019

रायबरेली, दि. १४ (पीसीबी) – रायबरेलीतील काँग्रेस आमदार अदिती सिंह यांच्यावर आज (मंगळवार) जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.  त्याआधी हल्लेखोरांनी अदिती यांच्या कारवर तुफान दगडफेक केली. घटनास्थळी समाजकंटकांनी गोळीबार देखील केला.

या हल्ल्यापासून वाचण्यासाठी अदिती यांनी गाडी वळवली आणि निघण्याचा प्रयत्न केला. परंतु, हल्लेखोरांनी त्यांच्या वाहनाचा पाठलाग केला.  यात अदिती यांचे वाहन उलटले. या हल्ल्यात त्यांना गंभीर दुखापत झाली  आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रायबरेली येथे जिल्हा परिषद अध्यक्षाच्या विरोधात अविश्वास ठरावावर मतदान होत आहे. यासाठी अदिती आणि जिल्हा परिषदेचे सदस्य मतदानाला जात होते. त्याच दरम्यान या वाहनांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला. मतदान रोखण्यासाठी मुद्दाम हिंसाचार करण्यात आला, असे आरोप केले जात आहेत. या घटनेसाठी भाजपचे लोकसभा उमेदवार दिनेश सिंह यांचे नाव समोर येत आहे. परंतु, पोलिस किंवा भाजपकडून यासंदर्भात काही प्रतिक्रिया आलेली नाही. या घटनेनंतर जिल्हा परिषद परिसरात बॅरिगेट आणि पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात  आला आहे. जिल्हा परिषदेच्या या इमारतीमध्ये सदस्य आणि अधिकाऱ्यांशिवाय कुणालाही प्रवेश दिला जात नाही.