काँग्रेसने शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांना नवरदेव बनवले आहे – ओवेसी

0
341

मुंबई, दि.२० (पीसीबी) – राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीबरोबरच भाजपावर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी उपहासात्मक टीका केली.

ओवेसी म्हणाले, “भारत पॉलिटिकल मॅरेज अॅक्टनुसार काँग्रेसने शिवसेनेसोबत, शिवसेनेने राष्ट्रवादीसोबत लग्न केले. तर भाजपाचा शिवसेनेसोबत घटस्फोट झाला. आता काँग्रेसने शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांना नवरदेव बनवले आहे,” अशी कोपरखळी ओवेसी यांनी चारही पक्षांना लगावली. काँग्रेस भारतीय पॉलिटिकल मॅरेज अॅक्टनुसार शिवसेनेसोबत विवाह करते आणि आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करते. ज्यावेळी जाणून घेतले. तेव्हा कळाले की, महाराष्ट्रात एकच पार्टी आहे, ज्याविरोधात बोलणे गरजेच आहे. नाही बोललो, तर मग कुणाचेही मत मिळत नाही, अशी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपाची अवस्था आहे,” असे ओवेसी म्हणाले. तिघांचा भारत पॉलिटिकल मॅरेज अॅक्टनुसार संगम झालेला आहे. चौथा निकाह २२ तारखेला करण्याची त्यांची इच्छा आहे,” असे म्हणत ओवेसी यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रमुख पक्षांवर टीकास्त्र सोडले.