काँग्रेसने माजी खासदार प्रिया दत्त यांना सचिव पदावरून तडकाफडकी हटवले

0
541

मुंबई , दि. १ (पीसीबी) –  काँग्रेसने माजी खासदार प्रिया दत्त यांना अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीच्या  सचिव पदावरुन हटवले आहे.  यासंदर्भात  काँग्रेस सरचिटणीस अशोक गहलोत यांनी प्रिया दत्त यांनी पत्र  पाठवले आहे.  या पत्रात पदावरून का हटवण्यात आले आहे, याचा उल्लेख करण्यात आलेला  नाही.  २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत प्रिया दत्ता यांचा  भाजपच्या पूनम महाजन यांनी  पराभव केला होता. त्यापासून त्या  सक्रीय राजकारणापासून दूर आहेत.   

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी तुमच्या अथक मेहनत आणि पक्षाच्या सचिव पदासाठी प्रशंसा करतात. पक्ष तुमच्या सेवेचा भविष्यात वापर करेल. सचिव असताना पक्षासाठी वेळ देण्यासाठी तुमचे आभार, असे पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, रविवारी  घेतलेल्या  बैठकीत  काँग्रेसचे मुंबई प्रदेश अध्यक्ष संजय निरुपम यांनी उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातील लोकसभेच्या संभाव्य उमेदवार म्हणून प्रिया दत्त यांच्या नावाची घोषणा केली. मात्र, प्रिया दत्त यांच्याविरोधात घोषणाबाजी करत निरुपम यांना कार्यकर्त्यांनी घेराव घातला. २०१४ च्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्या मतदारसंघात फिरकल्याच नाही. तरीही त्यांच्या नावाची घोषणा का करता, असा सवाल   कार्यकर्त्यांनी  केला होता.