काँग्रेसच्या ३ बंडखोरांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

326

पणजी, दि, १३ (पीसीबी) – काँग्रेसच्या दहा आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार केला आहे. काँग्रेसमधून आलेल्या दहापैकी तीन आमदारांना आज मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. माजी विरोधी पक्षनेते चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे.

माजी विरोधी पक्षनेते चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर, फिलिप नेरी, जेनिफर मोन्सेरात यांच्यासह माजी विधानसभा उपाध्यक्ष मायकल लोबो यांनी आज पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. आज सायंकाळी उशिरापर्यंत या मंत्र्यांचं खातं वाटप केलं जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. या दहाही आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने गोव्यातील भाजप सरकार मजबूत झालं असून विरोधकांचं संख्याबळ घटलं आहे. गोवा विधानसभेची एकूण सदस्य संख्या ४० इतकी आहे. गोव्यात काँग्रेसचे १७ आमदार होते. त्यातील दहा आमदार फुटल्याने आता ही संख्या ७ एवढीच राहिली आहे. तर भाजपचं संख्याबळ १७ वरून २७ वर पोहोचलं आहे