Maharashtra

काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांचा शिवसेनेत प्रवेश

By PCB Author

April 19, 2019

मुंबई, दि. १९ (पीसीबी) – काँग्रेस पक्षातील सर्व पदे आणि मूळ सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्ता प्रियांका चतुर्वेदी यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रियांका यांनी पक्षप्रवेश केला.

मुंबई ही माझी जन्मभूमी, कर्मभूमी आहे. पण गेल्या काही वर्षांत मुंबई तुटल्यासारखं वाटत होतं. मला पुन्हा येथे काम करायला मिळणार आहे, याचा खूप आनंद होत आहे,’ अशा शब्दांत प्रयांका यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. काँग्रेस पक्षात अखेरच्या काही दिवसांत होत असलेली घुसमटदेखील त्यांनी आपल्या भाषणात बोलून दाखवली. महिलांंसाठी काम करायला आवडेल. शिवसेनेच्या राज्यातच नव्हे तर देशातील प्रसारासाठी काम करणार, असं त्या म्हणाल्या. ‘प्रियांका चतुर्वेदी यांना जे ध्येय गाठायचं आहे, त्यासाठी त्यांनी शिवसेनेची निवड केली याचा आम्हाला आनंद आहे,’ असं उद्धव ठाकरे म्हणाले.

‘मुंबईत युथ काँग्रेसची सदस्य म्हणून मी दहा वर्षांपूर्वी काँग्रेसमध्ये आले. पक्षाने मला विविध व्यासपीठांवर शिकण्याची, प्रगतीची संधी दिली. पण गेल्या काही आठवड्यापासून अशा काही घटना घडल्या की माझ्या सेवेची पक्षाला किंमत नसल्याची जाणीव मला होत गेली,’ असं चतुर्वेदी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केलं आहे.